Osmanabad Corona Updates : जिल्ह्यात 22 मार्च पासुन संध्याकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचार बंदी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

0

Osmanabad Corona Updates : जिल्ह्यात
22 मार्च पासुन संध्याकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत संचार बंदी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

Osmanabad : ( osmanabad news ) जिल्ह्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर  ( Osmanabad Collector Kaustubh Divegavkar
) यांनी नवीन आदेश जारी केले आहेत या  मध्ये जिल्ह्यात 22 मार्च पासून संध्याकाळी सात ते सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत संचार बंदी आदेश जारी केले आहेत. या मध्ये औषध दुकानास 24 तास सुरु ठेवण्याची मुबा दिली आहे.

Osmanabad जिल्ह्यातील सर्व नगरपालिका , नगर पंचायती मध्ये रात्री 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचार बंदी ठेवण्यात आली आहे. व नगरपालिका , नगरपंचायती हद्दीमधील सर्व पेट्रोल पंप , बाजार पेठ , दुकाने संचार बंदी च्या वेळी व जनता कर्फ्यू वेळी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत व उस्मानाबाद शहरातील पोलिस पेट्रोल पंप यास 24 तास सेवा देण्यासाठी मुभा दिली आहे व आरोग्य विभागासाठी लागणारी वाहतूक व इतर सुविधा साठी मुभा देण्यात आली आहे.


Covid-19 च्या अनुषंगाने जिल्ह्यांमध्ये केलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती वर योग्य ती कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज रोजी दिनांक 19 मार्च रोजी आदेशित केले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top