उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाया

0



उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाया 

उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद पोलीसांनी काल शुक्रवार दि. 19.03.2021 रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 4 कारवाया करुन गुन्ह्यातील गावठी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला व अवैध मद्य जप्त करुन 4 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 4 गुन्हे नोंदवले आहेत.


(1) आपसिंगा, ता. तुळजापूर येथील लताबाई क्षिरसागर या आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 750 ₹) विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) परंडा येथील अजय सुनिल पवार हे बावची चौक, परंडा येथे 30 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,900 ₹) विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) तावरजखेडा लमाण तांडा, ता. उस्मानाबाद येथील 1)नंदकुमार राठोड 2)रमेश राठोड 3)अशोक चव्हाण 4)भारत राठोड 5)मालबाई राठोड 6)नवनाथ राठोड 7)विनायक पवार हे सर्वजण राहत्या तांडा परिसरात 3 वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रीत गावठी दारु निर्मीतीचा 4,200 लि. द्रवपदार्थ (किं.अं. 1,84,000 ₹) बाळगले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top