येरवडा कारागृहातून फरार झालेला आजन्म कारावासाचा शिक्षाबंदी अटकेत

0



येरवडा कारागृहातून फरार झालेला आजन्म कारावासाचा शिक्षाबंदी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखा: दत्ता किसन गायकवाड, वय 43 वर्षे, रा. कवठा, ता. उमरगा हे उमरगा पो.ठा. गु.र.क्र. 156 / 2005 या खूनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा येरवडा, पुणे येथील कारागृहात भोगत असतांना दि. 16.01.2021 रोजी फरार झाला होता. त्यावरुन त्याच्याविरुध्द येरवडा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 224 अंतर्गत गु.र.क्र. 34/2021 दाखल आहे. नमूद कैद्याचा मुळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याने तो कधीतरी  नक्कीच गावी परतेल या शक्यतेवरुन उस्मानाबाद पोलीसांनी खबरे सक्रीय केले होते. दत्ता गायकवाड हे आपल्या गावी आले असल्याची गोपनीय खबर मिळताच स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री सदानंद भुजबळ, पोहेकॉ- जगदाळे, ठाकुर, साळुंके, पोना- शेळके, पोकॉ- सर्जे यांच्या पथकाने त्यास  19.03.2021 रोजी ताब्यात घेउन पुणे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top