Osmanabad : जिल्ह्यातील शासकीय व्यवहाराशी संबंधित बँका 31मार्च रोजी रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवा - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश ( bank open 31 march 10 pm oder dm osmanabad )

0
                  
 शासकीय व्यवहाराशी संबंधित बँका 31मार्च रोजी रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवा - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश 
   उस्मानाबाद,दि.18(जिमाका) :- 2020-2021 या वित्तीय वर्षाचे रक्कमांचे सर्व व्यवहार दि.31 मार्च-2021 रोजी पूर्ण करणे आवश्यक आहेत.जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये व जनता यांनी शासकीय रक्कमांचा बॅकेत भरणा करणे आणि बँकेतून रक्कमा काढण्याच्या  कामी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्र.409 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार उस्मानाबाद जिल्हयातील शासकीय रक्कमेच्या देवणा-घेवाणीचा व्यवहार करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा तसेच सर्व राष्ट्रीयकृत बॅका या बुधवार दि.31 मार्च2021 रोजी रात्री 10.00 वाजेपर्यत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले आहेत.
                             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top