वाशी : पोलीसांच्या रात्रगस्तीदरम्यान 6.19 क्विंटल गांजा जप्त

0



वाशी : पोलीसांच्या रात्रगस्तीदरम्यान 6.19 क्विंटल गांजा जप्त

पोलीस ठाणे, वाशी: वाशी पो.ठा. चे सपोनि- श्री अशोक चौरे, पोना- जगताप हे पथकासह 17 मार्च रोजी 01.00 वा. सु. पारगांव येथे रात्रगस्तीस असतांना सुतार गल्ली येथील रस्त्यावर गर्दी जमलेली दिसली. तेथील लोकांना गर्दीचे कारण विचारता लोकांनी सांगीतले की, बाजूस उभ्या असलेल्या वाहन क्र. ए.पी. 36 टीबी 1652 चे चालक व सहायक हे लोकांना पाहुन पळुन गेले आहेत. यावर पथकाचा संशय बळावल्याने पिकअपची तपासणी केली असता हौद्यामध्ये टारपोलीनच्या खाली नारळ असुन त्याखालील पॉलीथीनच्या खाली तागाच्या 28 पोत्यांतील पुडक्यांत गांजा अंमली पदार्थ आढळला. पथकाने ते वाहन वाशी पो.ठा. येथे नेउन तहसीलदार, वाशी व वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक तसेच दोन शासकीय पंचांच्या समक्ष पिकअप मधील 28 पोत्यांतील एकुण 619.7 कि.ग्रॅ. गांजा व नमूद पिकअप वाहन जप्त केले आहे.

            यावरुन सपोनि- अशोक चौरे यांनी 17 मार्च रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाहन क्र. ए.पी. 36 टीबी 1652 च्या अज्ञात चालक व सहायकाविरुध्द एनडीपीएस ॲक्ट कलम- 20 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोनि- श्री उस्मान शेख हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top