Osmanabad : जिल्हयातील रविवारच्या जनता कर्फ्युमधून एमपीएससी ( MPSC ) परीक्षेशी संबंधितांना सूट - अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी
Osmanabad ,दि.18(जिमाका) :-कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हयामध्ये दर रविवारी जनता कर्फ्यू जाहिर करण्या आला आहे. दि.21 मार्च-2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 आहे.यापरीक्षेकरिता नियुक्त अधिकारी,कर्मचारी आणि परीक्षार्थी उमेदवार (प्रवेशपत्र जवळ बाळगणारे),परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व व्यक्तींना त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी दि.21 मार्च-2021 रोजीच्या जनता कर्फ्युमध्ये सूट देण्यात आली आहे.उर्वरित नागरिकांनी दि.21 मार्च-2021 रोजीच्या जनता कर्फ्युबाबतच्या नियमांचे पालन करावे,असे या आदेशात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे,अपर जिल्हादंडाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवकुमार स्वामी यांनी म्हटले आहे.
******