मुलाच्या निधनाची वार्ता समजताच आईचाही मृत्यू !हिंगळजवाडी येथील हृदय हेलावून टाकणारी घटना

0
मुलाच्या निधनाची वार्ता समजताच आईचाही मृत्यू !

हिंगळजवाडी येथील हृदय हेलावून टाकणारी घटना

उस्मानाबाद : हिंगळजवाडी ता, उस्मानाबाद येथील रमाकांत उर्फ पापा मधुकर नाईकनवरे वय 50 यांचे गुरुवारी दि, कोरोनाने निधन झाले, मुलाच्या मृत्यूची माहिती समजताच आई सुशीला मधुकर नाईकनवरे वय 70 यांचेही निधन झाले, दोघावर हिंगळजवाडी येथील शेतात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोनाचा उस्मानाबाद जिल्ह्यात उद्रेक झाला असून दररोज 700 ते 800 रुग्ण सापडत आहेत.  कोरोनाच्या पहिल्या लाटेत गंभीर आजार असलेले रुग्ण दगावत होते. आता दुसऱ्या लाटेत वृद्धासह तरुण ही दगावत आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजन ची गरज भासत असून जिल्ह्यात ऑक्सिजन बेड वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकांचा बळी जात आहे.
हिंगळजवाडी येथील पापा नाईकनवरे हे कोरोना पोसिटीव्ह असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या निधनाची माहिती त्यांच्या मातोश्री सुशीला नाईकनवरे यांना समजताच त्यांनीही घरी जीव सोडला, या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने तेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उस्मानाबाद नगर परिषद कर्मचारी सुनील उंबरे व ढोकी येथील बाळासाहेब वाकुरे यांचे मेहुणे व सासूबाई होत्या.

बातमी लेखन : पत्रकार सुभाष कदम , 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top