तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे 250 नागरीकांचे लसीकरण

0
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे 250 नागरीकांचे लसीकरण

नागरीकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शंभर टक्के लसीकरण

लसीकरण शांतेत पार पाडण्यासाठी तामलवाडी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता

प्रतिनिधि : भिमा भुईरकर.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे दि. २८ रोजी  तामलवाडी व परीसरातील नागरीक तसेच फ्रंटलाईन वर्कर अशा दोनशे पन्नास नागरीकांना लसीचा डोस देण्यात आला. यावेळी लस घेण्यासाठी नागरीकांनी शांततेत व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने शंभर टक्के लसीकरण झाले. 
    राज्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने नागरीकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी ४५ वर्ष व त्यावरील नागरिकासाठी लस उपलब्ध करून देण्यात आली.तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे लसीचे २५० डोस उपलब्ध झाले होते.या लसिकरण केंद्रावर तामलवाडी व परीसरातील नागरीकांनी सकाळपासून लस घेण्यासाठी रांग लावली तसेच फ्रंटलाईन वर्कर यानाही यावेळी लसीचा पहीला डोस देण्यात आला.अतिशय शांततेत सर्व नागरीकांनी लसीचा डोस देण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य,लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग तसेच प्रशासनाच्या सहकार्याने ४५ वर्षावरील नागरीक तसेच फ्रंटलाईन वर्कर अशा दोनशे पन्नास नागरीकांचे यावेळी,लसीकरण करण्यात आले.कोरोनावर मात करायची असेल तर लसीकरण आवश्यक असल्याचे सांगत आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत होती. 
      या लसीकरण मोहीमेवेळी आरोग्य अधिकारी डॉ करळे,समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी जळकोटे, स्वाती बारसकर, आरोग्य सहाय्यिका शोभा आदलिंगे, आरोग्य सेविका संगीता चव्हाण, ए एन एम संध्याराणी बराले,आरोग्य सहाय्यक चौधरी, आरोग्य सेवक प्रविण शिंदे, रुग्णवाहिका चालक रुपनर,ग्रामसेवक देवानंद रेड्डी, आशा कार्यकर्त्या चंद्रकला रणसुरे,अनिता लोखंडे, सपना शिंदे, सविता रणसुरे,जामाबाई करंडे, अंगणवाडी पर्यवेक्षीका एच व्ही शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, सतीश माळी,तसेच सिध्देश्वर मसुते,ज्ञानेश्वर माळी,शाहीर गायकवाड,संपत पाटील,पत्रकार सर्जेराव गायकवाड,जि.प.शिक्षकवृंद , ग्रामपंचायत कर्मचारी व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top