राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहा येथे कारवाई करून दारू साठा केला जप्त!
उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील मोहा या गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मिळालेल्या गोपनीय खबरे नुसार गावातील हॉटेल वाडा या ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली. या वेळी हॉटेल वाडा येथे छुप्या पध्दतीने विनापरवाना दारू विक्री होत असल्याच्या खबरे नुसार झडती घेण्यात आली. झडती मध्ये तब्बल 1,10,880₹ किमतीचा देशी/विदेशी दारुसाठा भरारी पथकास सापडला त्यानुसार मिळालेला मुद्देमाल जप्त करत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आरोपी सुरज कुमार झोरी याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
सदरचा दारुसाठा झोरी कोणास विक्री करत होता याचा तपास केला जात आहे. सदरची कारवाई विजय चिंचाळकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क उस्मानाबाद, यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एम. शेख निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उस्मानाबाद/लातूर, एस.पी.काळे दुय्यम निरीक्षक, जवान आर.आर.गिरी व व्ही.आय. चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.