स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त 
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

उस्मानाबाद , 28 ( प्रतिनिधी ) : थोर विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार आणि स्वातंत्र्यसेनानी असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार संतोष पाटील, पंकज मंदाडे, अव्वल कारकून नृसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top