शेतीसाठी लागणारे खत व पेट्रोल दरवाडीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

0

शेतीसाठी लागणारे खत व पेट्रोल दरवाडीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
 

लोहारा  /  प्रतिनिधी

 शेतीसाठी  लागणारे विविध प्रकारच्या खताची दरवाढ , पेट्रोलच्या  झपाट्याने वाढत चाललेल्या किमंती  गेलेल्या असल्याने हे सर्वसामान्य नागरिकांसाठी न परवडणारे आहे. 

यासाठी तात्काळ किंमती कमी करावे, या मागणीसाठी लोहारा तहसील कार्यालय येथे कोरोनाचे सर्व नियम पाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. 

लोहारा शहर अध्यक्ष आयुब हबीब शेख व तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली  केंद्र शासनाचे निषेध करीत लोहारा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

  कोरोनाचें गांभीर्य असल्याने तात्काळ आंदोलनानंतर तहसीलदार संतोष रुईकर यांच्या मार्फत पंतप्रधान  यांना निवेदन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने सर्व सामान्यांना शेतीचे खत व पेट्रोल दरवाढ करून दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोचे पोते ११७५ रुपयांचे होते. ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे.

यासोबत पोटॅश याची देखील किमत वाढविली आहे. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे, 

त्याच्या निषेधार्थ   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहारा तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय लोहारा येथे  आज दि. 17 मे  रोजी दुपारी 2 वाजता   आंदोलन करण्यात आले.

या आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, जालिंदर कोकणे, विजय लोमटे, हाजी बाबा शेख,बालाजी मेनकुदळे, नाना पाटील, बहादूर मोमीन, गगन माळवदकर, नवाज सय्यद, स्वप्नील माटे, सचिन रंणखांब, संजय जाधव विठ्ठल बुरकूटने आदीसह  या आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी  पोलीस उपनिरीक्षक जी बी कदम, पोलीस कर्मचारी एस एस पांचाळ, पठाण यांनी काम पाहिले.

खतांचा भाव वाढून शेतकर्‍याचे कंबरडे मोडले , दर कमी न झाल्यास यापुढे उग्र आंदोलन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top