लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ढोकी गावात रिक्षा ची व्यवस्था
उस्मानाबाद / तालुक्यातील ढोकी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सईदभाई काझी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नागरिकांना मोफत लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी रिक्षा ची व्यवस्था करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आळणी गावाचे सरपंच श्री.प्रमोदजी(मामाश्री) वीर यांच्या कामाची प्रेरणा घेऊन गावात मोफत लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आजपासून ही सुविधा नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित, माजी सरपंच शिवाजीराव देशमुख, उपसरपंच अमोल पापा समुद्रे, आळणी गावचे सरपंच प्रमोदजी वीर, सईद काझी, एस के इनामदार, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाअध्यक्ष ऍड.राजू कसबे, संजय कवडे, दौलत गाढवे, अब्रार काझी, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.