Osmanabad जिल्हा रुग्णालयातुन एक आरोपी फरार ,

0


Osmanabad जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ असलेला आरोपी फरार 


उस्मानाबाद (श.): आनंदनगर पो.ठा. गु.र.क्र. 138 / 2021 भा.दं.सं. कलम- 420, 465, 467, 468, 471, 34 या गुन्ह्यात तोरंबा, ता. तुळजापूर येथील अमोल शहाजी पाटील, वय 29 वर्षे यास अटक करण्यात आले होते. पोलीस कोठडीदरम्यान अमोल याची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यास जिल्हा व शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान दि. 16 मे रोजी 23.45 वा. अमोल याने शौचास जाण्याचे कारण कर्तव्यावर असलेल्या गृहरक्षक दल जवान ब.क्र. 113 भेटेकर यांना सांगीतले. यावर त्यास शौचालयात नेले असता शौचालयाच्या पाठीमागील खिडकीतून त्याने पलायन केले. यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 224 अंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

फरार आरोपी या बाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top