Osmanabad :जिल्ह्यातील लाँकडाऊन चा कालावधी वाढला , 1 जुन पर्यंत नवीन निर्बंध - जिल्हाधिकारी यांचे आदेश
उस्मानाबाद जिल्ह्यात 24 मे सोमवार पासुन जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेबरोवरच जीवनावश्यक बाबींना जिल्हाधिकार्यांनी सूट दिली आहे सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
काय चालु काय बंद वाचा ...
१. अत्यावश्यक सेवांमध्ये ( Essential Category ) समोवश असणा - या खालील बाबी पूर्ण वेळ सुरु राहतील . :
a ) दवाखाने , रोगनिदान केंद्रे , चिकित्सालये , लसीकरण केंद्रे , वैद्यकीय विमा कार्यालये , औषधालये , औषध कंपन्या , चष्मा दुकाने , इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा आणि त्यांची उत्पादन व वितरणासाठी सहाय्यक सर्व घटक जसे कार्यालये , वाहतूक , पुरवठा साखळी . लसींचे उत्पादन व वितरण , सॅनिटायझर्स , मास्क्स , वैद्यकीय साधनसामुग्री , त्यांची उपकरणे , कच्च्या मालाचे व सहाय्यक सुविधांचे घटक
b ) सार्वजनिक वाहतूक :
विमाने , रेल्वे , टॅक्सी , अॅटोरिक्षा व सार्वजनिक बसेस . c ) मालवाहतूक
d ) पाणीपुरवठा सेवा ( या सेवेसाठी काम करणा - या कर्मचा - यांनी ओळखपत्र वाळगणे बंधनकारक )
e ) खाजगी बसेस सह खाजगी वाहनांना फक्त अत्यावश्यक , अतितातडीच्या सेवांकरीता किंवा आदेशामध्ये दिलेल्या वैध कारणांकरीता वाहतूक करण्याची परवानगी राहील .
f) " ATM'S
g ) विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा ( या सेवेसाठी काम करणा - या कर्मचा - यांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक )
२. अत्यावश्यक सेवांमध्ये ( Essential Category ) समोवश असणा - या खालील बाबी सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु राहतील ..
१ ) सर्व किराणा दुकाने
२ ) भाजीपाला विक्रेते
३ ) फळ विक्रेते
४ ) दुध संकलन व वितरण केंद्र
५ ) सर्व प्रकारची खाद्यपदार्थाची दुकाने ( बेकरी , मिठाई , चिकन , मटन , पोल्ट्री , मासे व अंडी यांसह ) यांनी घरपोच सेवा ( Home Delivery ) देण्यास प्राधान्य द्यावे .
६ ) रेस्टॉरंट्स , बार , हॉटेल यांना फक्त घरपोच सेवा ( Home Delivery ) देण्यास परवानगी राहील . दुकाने बंद राहतील .
७ ) पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने
८ ) सर्व पेट्रोल पंप टिप : - या सर्व दुकानांना सकाळी ११ नंतर घरपोच सेवा ( Home Delivery ) देण्याकरीता परवानगी असणार नाही . अपवादा १ ) सर्व राष्ट्रीयकृत / सहकारी / खाजगी बँका , पोस्टाच्या ( डाक विभागाच्या ) सेवा दुपारी २ पर्यंत नागरिकांसाठी चालू ठेवता येतील व दुपारी २ नंतर नागरिकांसाठी या सेवा बंद करुन ( प्रवेशद्वार बंद करुन ) अंतर्गत कार्यालयीन कामकाज करता येईल . ( याठिकाणी काम करणा - या व्यक्तींनी कामकाज संपल्यानंतर बाहेर पडताना संबंधित विभागाने निर्गमित केलेले ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील . ) २ ) कृषिविषयक उपक्रम आणि कृषि विषयक कामे सुरळितपणे सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेल्या संबंधित बाबी जसे कृषि अवजारे , बियाणे , खते , उपकरणे व त्यांची दुरुस्तीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत चालू राहतील . या कार्यालयाच्या संदर्भ क्रं .६ अन्वये बंद असलेल्या व वरील बाब क्रं .१ व बाब क्रं .२ मध्ये समावेश नसलेल्या सर्व बाबी आस्थापना , सार्वजनिक ठिकाणे , बाबी / उपक्रम , सेवा पूर्णवेळ बंद राहतील . शनिवारी व रविवारी जनता कपर्युचे पालन करण्यात यावे .
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६० ) कलम १८८ व इतर लागू होणा - या कायदेशीर तरतुदीनुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहील . सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक २४/०५/२०२१ रोजी सकाळी ०७.०० पासून तात्काळ लागू करण्यात येत असून सदर आदेश दिनांक ०१ जुन , २०२१ - सकाळी ०७.०० वाजेपर्यंत लागू राहील .
असे आदेशात नमुद केले आहे.