उस्मानाबाद / परंडा :
राजेंद्र कुदळे, रा. खानापुर यांची परंडा- सोनारी रस्त्यावरील आपल्या हॉटेल समोर ठेवलेली डिसकव्हर मोटारसायकल क्रमांक एम एच 25 झेड 5294 ही दि 27 जुन रोजी अज्ञाताने चोरुन नेली होती. तपासादरम्यान परंडा पो.ठा.च्या पोनि- सुनिल गिडडे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोफौ-जगताप, पो.ना.- शिंदे, होमगार्ड-परांडकर यांच्या पथकाने गोपनिय माहिती आधारे गतीमान तपास करुन कुकडगाव येथील भगवान हरीचंद्र भोसले, वय 23 वर्षे, यास आज दिनांक 30.06.2021 रोजी अटक करुन नमुद चोरीच्या मोटार सायकलसह चोरी करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल त्याच्या ताब्यातुन जप्त केली आहे.
अशी माहिती पोलीस माहिती विभागाने दिली आहे.