कळंब : मुस्लिम समाजाच्या ईदगाह जागेचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कळंबचे नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कळंब मधील मुस्लिम बांधवांना ईदच्या नमाज पठण करण्यासाठी हक्काची अशी जागा नाही. प्रत्येक वेळी निवडणूक आली की राजकीय मंडळी या मुद्द्याच्या नावाखाली मुस्लिम मतदान वळवण्याचा प्रयत्न करतात. निवडणूक येताच हा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र नंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. २०१६ च्या निवडणुकी वेळी देखील सत्ताधाऱ्यांनी जाहीर नाम्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे वचन दिले होते. अद्याप मात्र मुस्लिम समाजाच्या ईदगाहचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही सत्तेत नसलेले राजकीय नेते हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देखील देत आहेत आणि प्रत्येक वेळी प्रमाणे मुस्लिम समाजाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी कळंब न.प. ने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर कळंब भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष माजेदअली (शाहरुख ) सय्यद, बाळासाहेब शिंपले, आखलाख सय्यद, सईद चाऊस, अजीम मणियार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..