जनावरांची निर्दयपणे वाहतुक करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

0


तामलवाडी :   उस्मानाबाद – सोलापुर महामार्गावर  दि. 26 जून रोजी तामलवाडी पोलीस गस्तीस असतांना माळुंब्रा विदयुत उपकेंद्रासमोर पोलीसांना अशोक लेलॅन्ड दोस्त वाहने क्रमांक एम एच 25 ए जे 6700 व एम एच 12 एन एक्स 9542 दिसली. या वाहनांत अत्यंत दाटीवाटीने,चारा न पुरवता, जनावरांची  निर्दयपणे व विनापरवाना वाहतुक चालक तानाजी खराडे रा.मसला खुर्द व अब्दुल सय्यद रा.उस्मानाबाद हे करत असल्याचे आढळले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- पशु क्रुरता प्रतिबंधक कायदा व महाराष्ट पोलीस कायदा अंतर्गत तामलवाळी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 हेही वाचा...

सेक्सटॉर्शन पासुन सावध राहण्याचे पोलीस दलातर्फे जनतेस आवाहन 

http://www.osmanabadnews.in/2021/06/blog-post_707.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top