उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी : तीन ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल
चोरी
नळदुर्ग : शेटे तांडा,धनगरवाडी येथील गणेश निसरगुंडे हे 25-26 जुन दरम्यानच्या रात्री घरात झोपलेले असतांना अज्ञाताने त्यांच्या घरात प्रवेश करुन घरातील 23 ग्रॅम सुवर्ण दागिने व 80,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या निसरगुंडे यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
बेबंळी: भालचंद्र मते यांच्या पाटोदा येथील हार्डवेअर दुकानासह शेजारच्या दुकानाचा कडी कोयंडा 25-26 जुन दरम्यानच्या रात्री गावातीलच दोघा व्यक्तींनी उचकटुन आतील वेल्डींग मशीन,ड्रिलींग मशीन,ग्राईंडर मशीन,एस टी पी पम्प असे साहित्य व 5,300 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या मते यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461,380 अंतर्गत बेबंळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा: अशोक स्वामी यांच्या कोरेगाव शिवारातील शेतातुन 25-26 जुन दरम्यानच्या रात्री सिआरआय 7.5 अश्व शक्ती विदुयत पम्प अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या स्वामी यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद (शहर) : ॲडव्होकेट उमर मोरवे रा.उस्मानाबाद हे दिनांक 26 जुन रोजी शहरातील देशपांडे स्टॅन्ड येथे भाजीपाला खरेदी करत असतांना त्यांच्या शर्टच्या खिशातील स्मार्ट फोन अज्ञाताने चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
नळदुर्ग: नागेश बोगरगे रा.खुदावाडी हे दि.24 जुन रोजी 07.30 वा वडील दिगंबर यांसह घरासमोर उभे होते. या वेळी भाउबंद संजय, अजय या पिता पुत्रांसह अजय ची आई हिराबाई या तिघांनी कोरोना रुग्न घरात असल्याच्या वादातुन नागेश व पिता दिगंबर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटेने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नागेश यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 34 अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : क्राक्रंबा येथील निव्रत्ती दासा साबळे व दगडु दासा साबळे या दोघा भावांच्या कुटुंबात दि 25 जुन रोजी 13.30 वा शेतीविषयक कामातुन वाद झाला. यात दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधी गटास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कु-हाडीच्या दांडयाने मारहान करुन खुनाची धमकी दिली अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दि. 26 जून रोजी परस्पर विरोधी दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504,506, 143,147, अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
वाशी : ॲडव्होकेट अजितकुमार पाटील हे दिनांक 25 जुन रोजी विजोरा ग्रामपंचायत बैठकीस हजर होते. यावेळी अनावश्यक लोकांनी बैठकीस हजर राहण्यास त्यांनी विरोध केल्याने गावकरी 1) महादेव रामलाल क्षत्रीय 2) गणेश अंगद खोसे 3) अनिल जगन्नाथ खोसे यांनी अजितकुमार यांना शिवीगाळ करुन, खुनाची धमकी देउन धारदार पात्याने व खुर्चीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अजितकुमार यांनी दि.26 जुन रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324,323,504,506,34 अंतर्गत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.