उस्मानाबाद जिल्ह्यात भुम , कळंब , तुळजापूरात जुगार विरोधी कारवाई

0


उस्मानाबाद जिल्ह्यात भुम , कळंब , तुळजापूरात जुगार विरोधी कारवाई

भुम:  गोपनिय खबरे आधारे भुम पोलीसांनी दि 28 जुन रोजी गोलाई चौकातील एका टपरीजवळ  छापा टाकला असता जिमल पठाण व मुक्तार सौदागर हे दोघे जुगार चालवण्याच्या उददेशाने  मटका जुगार साहित्य व 2410 रु रक्कम बाळगलेले आढळले. तर महेश मोरे व राहुन हरकुडे हे भुम बसस्थानकामागे आडोशाला जुगार चालवण्याच्या उददेशाने जुगार साहित्य व 7560 रु रक्कम बाळगलेले आढळले.

कळंब :  गोपनिय खबरे आधारे कळंब पोलीसांनी दि 28 जुन रोजी छ. शिवाजी महाराज  चौकातील एका टपरीजवळ  छापा टाकला असता सागर हिरे, चंदर मुंडे, समीर मुंडे हे तिघे जुगार चालवण्याच्या उददेशाने जुगार साहित्य व 1510 रु रक्कम बाळगलेले आढळले.

तुळजापूर :  गोपनिय खबरे आधारे तुळजापूर पोलीसांनी दि 28 जुन रोजी अपसिंगा गावात एका हॉटेल समोर छापा टाकला असता  अविनाश रोकडे हे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने जुगार साहित्य व 1510 रु रक्कम बाळगलेले आढळले.

      या वरुन पोलीसांनी जुगार साहित्य व  रककम जप्त करुन  नमुद आरोपी विरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top