उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन ठिकाणी चोरी , दोन ठिकाणी अपघात , एक ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल

0




चोरी.

पोलीस ठाणे, उमरगा: जयराम बाबुराव बिराजदार, रा. तलमोड, ता. उमरगा यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. के.ए. 56 के 0836 ही दि. 28 जून रोजी 22.00 वा. सु. राहत्या घरा समोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मो.सा. त्यांना लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या जयराम बिराजदार यांनी दि. 20 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, कळंब: देविदास लिंबाजी अंकुशे, रा.  हावरगाव, ता. कळंब हे दि. 20 जून रोजी रात्री पत्नी- विमलबाईसह राहत्या घरात झोपले असतांना 01.00 वा. सु. चार अज्ञात पुरुषांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. नमूद चौघांनी अंकुशे पती- पत्नीस धाक दाखवून त्यांचे हात- पाय साडीने बांधून ठेउन घरातील 85 ग्रॅम वजनाचे सुवर्ण व 140 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या आभुषनांसहीत 30,000 ₹ रोख रक्कम लुटून पोबारा केला. अशा मजकुराच्या देविदास अंकुशे यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

अपघात.

पोलीस ठाणे, तुळजापूर: लक्ष्मण कृष्णाथ सोलनकर, रा. कार्ला, ता. तुळजापूर यांनी दि. 10 जून रोजी 14.30 वा. सु. काक्रंबा शिवारातील रस्त्यावर टाटा मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 एएल 2453 हा निष्काळजीपने अचानक वळवून मो.सा. क्र. एम.एच. 12 जीक्यु 5647 ला धडक दिली. या अपघतात नमूद मो.सा. चालक- आबा  प्रभाकर पांडगळे, वय 38 वर्षे, काक्रंबा, ता. तुळजापूर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयाताचा भावाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, नळदुर्ग: भिमाप्पा धोत्रे, वय 48 वर्षे, रा. बेळगाव, राज्य- कर्नाटक हे दि. 18 जून रोजी 20.00 वा. सु. नळदुर्ग येथील राष्ट्रीय महार्मावरील गोलाई परिसरातून पायी जात असतांना कंटेनर ट्रक क्र. एन.एल. 01 एल 4638 ने त्यांना पाठीमागून धडक देउन तुडवल्याने ते जागीच मयत झाले. या अपघाताची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता नमूद कंटेनर ट्रकचा अज्ञात चालक वाहनासह अपघातस्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या हनुमंत सोमवंशी, रा. वडारवाडी, नळदुर्ग यांनी दि. 20 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहान.

पोलीस ठाणे, परंडा: आकाश राजेंद्र तांबे, रा. देवळाली, ता. भुम यांच्या शेतातील नळ मार्ग भाऊबंद पिता- पुत्र हरिश्चंद्र व सागर तांबे यांनी दि. 20 जून रोजी ट्रॅक्टरद्वारे उकरुन शेताबाहेर नळ नेण्याचा प्रयत्न केला. यास आकाश तांबे यांनी विरोध केला असता नमूद दोघा पिता- पुत्रांनी आकाश यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहान केली. या मारहानीची तक्रार पोलीस ठाण्यास देण्याकरीता आकाश जाउ लागले असता नमूद दोघांनी त्यांना, “तुला कुऱ्हाडीने तोडून टाकेन.” अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या आकाश तांबे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top