उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी , दोन ठिकाणी मारहाण , एक अपघात गुन्हे दाखल !

0


उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी , दोन ठिकाणी मारहाण , एक अपघात गुन्हे दाखल !


चोरी.

उस्मानाबाद (ग्रा): सादिक शेख  रा. उस्मानाबाद  यांच्या जहागीरदारवाडी येथील शेतातील घराचे  30 पत्रे व दारे खिडक्या हे दि. 31 मे  रोजी 08.30 वा जहागीरदारवाडी मधला तांडा येथील राठोड कुटुंबांतील 8 स्त्री-पुरुषांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या त्यांच्या  दि. 25  जून रोजीच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद - आनंदनगर: सिध्देश्वर शिंदे रा. शांतीनिकेतन, उस्मानाबाद यांच्या घराचा कडी-कुलुप  दि. 23-25 जुन दरम्यान  अज्ञाताने उचकटुन घरातील 7.5 ग्राम सुवर्ण दागिने व 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिंदे  यांनी दि. 25 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

अपघात.

तुळजापुर : विकास अशोक जाधव  वय 39 वर्षे, रा. सांगवी (मार्डी) हे दि. 21 जून रोजी 21.00 वा. सु. गावातील रार्ष्टीय महामार्गावरुन पायी जात होते. या वेळी तुळजापुर –सोलापुर जाणा-या कार क्रं. एम.एच.25 आर.6105 ने त्यांना धडक दिल्याने जाधव हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी स्वाती यांनी दि. 25 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

 “मारहान. 

उस्मानाबाद (ग्रा.): न्हानी घराचे सांडपाणी वाहन्याच्या वादातुन येडशी येथील द्रौपदी मंजुळे यांना त्यांच्या घरासमोर भाऊबंद दशरथ, अनिता, लक्ष्मण, विजु  यांनी 22 जुन रोजी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या द्रौपदी  यांनी दि. 25 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 34 अंतर्गत उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद (श): रुतुजा इश्वर इंगळे  रा. अजिंठा नगर  उस्मानाबाद या  22 जुन रोजी 20.30 वा आपल्या घरासमोर होत्या. यावेळी गल्लीतील  आकाश व  गोपी बनसोडे या दोघां भावासह अक्षय गंगावणे यांनी रुतुजा यांसह त्यांच्या वडीलांस  शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रुतुजा   यांनी दि. 25 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 323, 504, 34 अंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top