उमरगा : महाविकास आघाडीमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गमावावं लागलं -- भाजप

0

भाजपाच्या वतीने उमरगा शहरातील चक्काजाम आंदोलन

महाविकास आघाडीमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गमावावं लागलं, भाजप

आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ देनार नाही, संताजी चालुक्य

 उमरगा:-दि.26 { सुरज आबाचने }  ओबीसींचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण संपवणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज सकाळी तहसील कार्यालय येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या वतीने राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले  प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतांजी चालुक्य यांचे नेतृत्वाखाली तहसील कार्यालय समोर  हे आंदोलन करण्यात आले. 
या आंदोलनात याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य संताजी काका चालुक्य, जिल्हा उपाध्यक्ष अभयराजे चालुक्य,जिल्हा सरचिटणीस माधव पवार, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, समाज कल्याण सभापती  दिग्विजय शिंदे, युवा नेते हर्षवर्धन चालुक्य, सुलोचना वेदपाठक महिला मोर्चा तालुकाध्यक्ष, अनिल बिराजदार, नागनाथ गायकवाड, प्रशात माने,बाबुराव कलशेट्टी,विकास दुधभाते,महेश कलशेट्टी, जवंत कुलकर्णी ,ज्योती कुलकर्णी महिला मोर्चा उपाध्यक्ष,व इतर कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते आदी सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपस्थित होते.

भाजपाच्या वतीने दिलेले आरक्षण काढून घेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमुळे झाले. महाविकास आघाडीने योग्य ती बाजू सुप्रीम कोर्टात मांडली नाही त्यामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण पुनर्स्थापित करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होता कामा नये असा इशारा संताजी चालुक्य यांनी दिला.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवारी (दि. २६) शहरातील तहसील कार्यालय समोरच सकाळी 11:30 वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
सतांजी चालुक्य पुढे म्हणाले, आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारने केले. हे सरकार टाईमपास सरकार आहे. कोणीच कोणाचं ऐकत नाही हा या तीन पक्षाच्या सरकारचा समान कार्यक्रम आहे. सगळा बट्ट्याबोळ गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीत करून ठेवला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी भाजपा मैदानात उतरून लोकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने चक्का जाम आंदोलन छेडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top