उमरगा :- ( महादेव पाटील ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती " समता दिन" म्हणून ॲड. शितल चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने उत्साहात शनिवारी साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांनी शाहू महाराजांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा असे सांगितले होते. त्याप्रमाणेच ही जयंती विचारांची देवाण-घेवाण करणारा सोहळा म्हणून साजरी केली गेली.
याप्रसंगी शिवमती रंजनाताई हासुरे यांनी शाहू महाराजांचे जीवन चरित्र आणि कार्य यावर व्याख्यान दिले. प्रमुख पाहूणे म्हणून ॲड. सयाजी शिंदे, शिवश्री भास्कर वैराळ व शिवमती रेखाताई पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाला शितल चव्हाण फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, उपाध्यक्ष राजू उर्फ व्यंकट भालेराव, सचिव किशोरभाऊ औरादे, सहसचिव करीमभाई शेख, ॲड. ख्वाजा शेख, शिवश्री अंबादास जाधव, प्रदिपजी मोरे, धानय्या स्वामी, श्री जाधव, सुमनताई सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.