उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रगस्ती दरम्यान दोन ठिकाणी पाच संशयीत ताब्यात.

0

उस्मानाबाद जिल्हा: कळंब पो.ठा. चे पथक दि. 22.06.2021 रोजी 02.15 वा. सु. रात्रगस्तीस असतांना ईटकुर- वाकडी रस्त्यालगत असलेल्या बियर बारच्या आडोशाला 1)बबलु आप्पा शिंदे 2)अजय अशोक काळे, दोघे रा. मोहा, ता. कळंब 3)लाला दत्ता पवार, रा. कोठावळवाडी, ता. कळंब हे तीघे संशयास्पदरित्या थांबलेले आढळले. तेथे उपस्थीत असण्याच्या कारणांबाबत पथकाने त्या तीघांना विचारले असता ते असंबध्द माहिती देउ लागले. यावर पथकाने त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ एक लोखंडी गज मिळुन आला. यावरुन ते तीघे काहीतरी मालाविषयी गुन्ह्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरुन पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

तसेच आंबी पो.ठा. चे पथकही यांच दिवशी 03.00 वा. सु. रात्रगस्तीस असतांना कुक्कडगावातील बस थांबा परिसरात 1)विदुषक गुलच्या काळे 2)भावड्या गुलच्या काळे, दोघे रा. वालवड, ता. भुम हे दोघे संशयीतरित्या एका मोटारसायकलवर फिरत असतांना पथकास आढळले. पथकाने त्यांची विचारपुस करुन झडती घेतली असता त्यांच्या जवळ सत्तुर, दोन चाकू व वाहनास गुंडाळलेली एक दोरी मिळुन आली. यावर ते दोघे काहीतरी माला विषयी गुन्ह्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरुन पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

पोलीसांनी वरील पाच जणांविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122 (अ), 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top