उस्मानाबाद जिल्ह्यात पोलिसाची जुगार विरोधी विशेष मोहिमे दरम्यान २४ छापे

0

उस्मानाबाद जिल्हा : मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशाने काल दि. 22.06.2021 रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमे दरम्यान आढळलेले जुगार साहित्य व रोख रक्कम यांची एकत्रीत किंमत 1,19,800 ₹ आहे. यावरुन खालील नमूद 30 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1) गणेश मुसळे व सोहेल पठाण, दोघे रा. भुम हे भुम येथे अनुक्रमे शाळु गल्ली व गराडा गल्ली अशा दोन ठिकाणी एकत्रीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 2,680 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) स्वामीनाथ हळगोदे, रा. अणदुर हे गावातील एका हॉटेलच्या बाजूस तर रमेश बंडगर, रा. सलगरा (दि.) हे गावातील पानस्टॉल समोर एकत्रीत कल्याण मटका जुगार साहित्य व 1,690 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना नळदुर्ग पो. ठा. च्या पथकास आढळले.

3) महोदव बचुटे, रोहिदास गायसमुदे्र, फिरोज शेख, दत्ता मस्के, चौघे रा. कळंब हे कळंब येथील वेगवेगळ्या दोन ठिकाणी एकत्रीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 5,910 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) वसंत दरेकर, रा. हाडको, तुळजापूर हे नाईक गल्ली, तुळजापूर येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,590 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. तर मशाला जाधव, अविनाश चव्हाण, बालाजी पवार, रमेश रोकडे, अमोल इंगळे, सर्व रा. तुळजापूर तुळजापूर बस स्थानकजवळ एकत्रीत कल्याण मटका जुगार साहित्य, 5 भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा एकुण 97,020 ₹ बाळगलेले असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळले.

5) बस्वराज उपासे, रा. जेवळी (उ.) हे राहत्या कॉलनीत तर रंगराव चिवरे, रा. सास्तुर हे गावातील चौकात एकत्रीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,140 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

6) महंमद तांबोळी, रा. इंदीरानगर, उस्मानाबाद हे राहत्या परिसरात तर गोविंद विधाते, रा. उस्मानाबाद हे जुना बसडेपोजवळ एकत्रीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 2,790 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

7) राम पाटील, रा. धाकटेवाडी हे गावातील एका झाडाखाली तर संतोष गुरव, रा. कसगी हे आपल्या राहत्या घरासमोर एकत्रीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,740 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

8) महेश हाके, रा. येडशी हे गावातील दिल्ली दरबार चौकात तर विनोद साळुंके, रा. सारोळा हे गावातील एका टपरीच्या बाजूस एकत्रीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 860 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

9) दिनकर गेळे, रा. आनाळा, ता. परंडा हे गाव चौकातील पानटपरीच्या बाजूस कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,050 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

10) प्रमोद सोलापूरे, रा. आष्टाकासार, ता. लोहारा हे गाव परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 510 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

11) राजाभाउ कांबळे, रा. ज्ञानेश्वर नगर, उस्मानाबाद हे राहत्या परिसरात मिलन नाईट जुगार चालवण्याचे साहित्य व 610 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.

12) परसु कांबळे, रा. येरमाळा हे गावातील बस स्थानक परिसरात मुंबई मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 270 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.

13) गोविंदसिंग बायस, रा. ताकवीकी, ता. उस्मानाबाद हे गावातील एका हॉटेल समोर मुंबई मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 510 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.

14) अनिल काशीद, रा. तामलवाडी हे पिंपळा रस्त्यालगत मुंबई मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 700 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले.

15) कांतीलाल वाघचौरे, रा. जवळा (नि.) हे गाव शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 350 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

16) सतिश कसबे, रा. तेर हे गाव शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 380 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top