परिवाराचा सामूहिक आत्महत्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
परिवाराचा सामूहिक आत्महत्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवलाली जागृती विद्यामंदिर यांना तक्रारदार यांनी नोकरीच्या बदल्यात दिलेली जादा जमीन व शाळा अनुदानित करण्यासाठी कर्ज काढून दिलेली रक्कम परत मिळण्याबाबत , नोकरीच्या बदल्यात मोफत जमीन खरेदी करुन 2003 साला पासुन मुलास विना वेतन संस्थेवर काम करून घेऊन फसवणूक केली आहे मुख्याध्यापक , संस्थाप्रमुख यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे दि 16 जुन रोजी निवेदन देण्यात आले आहे.

संस्थाप्रमुख , जागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातुर व मुख्याध्यापक , जागृती विद्यामंदिर , देवलाली याच्याकडुन शाळेला दिलेली जमीन सोडून राहते घर व बैलांचा गोठा , विहीर असलेली जागा संस्था प्रमुख व मुख्याध्यापक मागत आहेत व न दिल्यास मुलाला संस्थे वरून कामावरून काढून टाकत असल्याची वारंवार धमकी देत आहेत , वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून सह परिवारासोबत आत्महत्या करण्याची वेळ परिवारावर आली आहे प्रशासनाचे याकडे तात्काळ कारवाई न केल्यास आत्महत्या केल्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा आत्महत्या केल्यास सर्व जबाबदारी संस्थाप्रमुख लक्ष्मण जाधवर व मुख्याध्यापक याची राहील असे निवेदनात नमूद केले आहे.

 चंदर माऊली बिक्कड , कौशल्या बिक्कड ,बाबासाहेब बिक्कड , श्रीकांत बिक्कड , लता बिक्कड , वैष्णवी बिकड ई.च्या निवेदनावर सह्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top