उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान १९ छापे .

0


पोलीस ठाणे वाशी:  अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन  वाशी  पो.ठा. च्या पथकाने  दि. 01 जूलै रोजी 10.45 वा लावंड वस्ती कन्हेरी  येथे छापा टाकला असता बंडु रामहरी लावंड हे  त्यांचे राहते घराचे पाठीमागे देशी दारुच्या 08  बाटल्या तसेच  11.00 वा शिंगनास नबीलाल  काळे यांचेकडे राहते घरासमोरुन  10 लीटर गावठी दारु   तर   12.10 वा पारगाव येथे छापा टाकला असता मंगल अरुण पवार यांचे राहते घरासमोर 10 लीटर गावठी दारु अवैधपणे  बाळगलेले  आढळुन आले.

पोलीस ठाणे नळदुर्ग  :  नळदुर्ग  पो.ठा. च्या पथकाने दि. 01  जूलै रोजी 16.20  लोहगाव येथे छापा टाकला असता कवीता रमेश राठोड यांचे घरासमोर देशी दारुच्या 05  लिटर गावठी दारु तर 19.30 वा भैरवनाथ पोल्ट्री फार्म जवळ छापा टाकला असता वसंत नेमु चव्हाण हे 16 ली गावठी दारु अवैधपणे  बाळगलेले आढळलेले.

पोलीस ठाणे कळंब : कळंब पो.ठा. च्या पथकाने दि. 01 जूलै रोजी  12.45 इंदीरी नगर कळंब येथे छापा टाकला मिरा राजेंद्र काळे या त्यांचे घरासमोर देशी दारुच्या 47 बाटल्या अवैधपणे  बाळगलेल्या आढळल्या. तर 16.20 वा ललीता संजय काळे, रा. इंदीरा नगर कळंब या त्यांचे राहते घरासमोर 10 लीटर गावठी दारु अवैधपणे  बाळगलेल्या आढळल्या.

पोलीस ठाणे उस्मानाबाद-ग्रामीण : उस्मानाबाद-ग्रामीण पो.ठा. च्या पथकाने दि. 01 जूलै रोजी 17.10 वा गावसुद येथे छापा टाकला असता राजेंद्र रघु पवार रा.गावसुद ते त्यांचे घरासमोर 35 लीटर गावठी दारु तर 18.45 वा अंबेजवळगे येथे छापा टाकला असता अशोक तानाजी साबळे हे 45 ली गावठी दारु किं 2710 रु ची अवैधपणे  बाळगलेले आढळले.

पोलीस ठाणे भुम : भुम पो.ठा. च्या पथकाने दि. 01 जूलै रोजी 18.40 वा वाकवड येथे छापा टाकला असता कमलाबाई किसन शिंदे, रा.वाकवड  या त्यांचे  पत्रा शेडसमोर 08 लि.गवाडी दारु अवैधपणे  बाळगलेल्या आढळल्या.

पोलीस ठाणे तुळजापूर : तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने दि. 01 जूलै रोजी 19.30 वा ढेकरी येथे छापा टाकला असता बालाजी वसंत देडे, रा.ढेकरी हे गावठाण जागेत देशी दारुच्या 31 बाटल्या अवैधपणे  बाळगलेले आढळले.

पोलीस ठाणे आनंदनगर : आनंदगनर पो.ठा. च्या पथकाने दि. 01 जूलै रोजी 20.30 वा  सांजा पारधी पिडी येथे छापा टाकला असता ताई रामभाउ काळे,रा.सांजा पारधी पिढी या 15 लि. गावठी दारु तर 19.15 वा सेवालाल कॉलनी येथे छापा टाकला असता आरती खंडु काबंळे या 5 ली गावठी दारु ची  अवैधपणे  बाळगलेल्या आढळल्या.

पोलीस ठाणे तामलवाडी : तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने दि. 01 जूलै रोजी 18.45 वा. पिंपळगाव (बु) येथे छापा टाकला असाता ज्योतीराम भिवा पाटील, रा. पिंपळगाव (बु) हे शेत शिवार अट नं 34 मध्ये 12 ली गावठी दारु अवैधपणे  बाळगले आढळले.

पोलीस ठाणे ढोकी : ढोकी पो.ठा. च्या पथकाने दि. 01 जूलै रोजी 17.00 वा कोल्हेगाव येथे छापा टाकला असता  लिलाबाई  बाबुलाल चव्हाण या 20 ली.गावठी दारु  तर 17.45 वा. कोल्हेगाव ते शिराढोण जाणारे रोडवर  छापा टाकला असाता बाबुलाल श्रीरंग चव्हाण हे देशी दारुच्या 29 बाटल्या तसेच 18.30 वा ढोकी पेट्रोल पम्प चौक येथे छापा टाकला असता प्रभाकर अशोक शिंदे हे 15 ली. गावठी दारु  अवैधपणे  बाळगले आढळले.

पोलीस ठाणे उस्मानाबाद –शहर : उस्मानाबाद-शहर पो.ठा. च्या पथकाने दि. 01 जूलै रोजी 19.15 वा बौध्द नगर लगत छापा टाकला असता सचिन महादेव ओव्हाळ हे पत्रा शेडलगत 9 ली गावठी दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले.  

पोलीस ठाणे बेबंळी : बेबंळी पो.ठा. च्या पथकाने दि. 01 जूलै रोजी 18.00 वा आंबेवाडी चौक येथे छापा टाकला असता सुनिल दशरथ कदम हे देशी दारुच्या 16 बाटल्या अवैधपणे  बाळगलेले आढळले.

या छाप्यांत आढळलेली 215 लीटर गावठी  दारु व देशी-विदेशी दारुच्या प्रत्येकी 180 मी.ली. च्या 131 बाटल्या जप्त करुन पोलीसांनी महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 19 गुन्हे  नोंदवलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top