उस्मानाबाद :- तेरणा महाविद्यालय येथे श्री.बी.बी . पाटील यांचा सेवागौरव समारंभ संपन्न झाला.
महाविद्यालयात बी. बी. पाटील यांनी 33 वर्षे सेवा केली. ते मुख्य लिपिक या पदावरून 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले.सेवागौरव समारंभ कार्यक्रमात डॉ.रशीद सय्यद,डॉ.चंद्रजित जाधव,डॉ.सुशीलकुमार सरवदे,डॉ.डी.बी.मोरे,प्रा.माणिक गोडसे,श्री.कैलास कापसे यांनी मनोगत व्यक्त केले.त्यांच्या व्यक्ती गुणांवर सर्वांनी प्रकाश टाकला.
सर्वांशी आपुलकीने वागणे,काम करत असताना कोणत्याही कामात निष्काळजीपणा नाही हा त्यांचा गुण महत्वपुर्ण आहे ,असे सांगितले .कबड्डीचा खेळाडू असणारे पाटील कॉलेजच्या कामातही खेळाडूवृत्तीने राहिले .
आज 33 वर्षे महाविद्यालयात सेवा करून ते सेवानिवृत्त होत आहेत.सत्काराला उत्तर देताना बी. बी.पाटील यांनी या महाविद्यालयातील सर्व कर्मचारी ,प्राध्यापक आपुलकीने वागले,प्राचार्य ,डॉ.अशोक घोलकर यांनी प्रत्येक कामात सहकार्य केले,म्हणून आनंदाने सर्व कामे व्यवस्थित पार पूर्ण करता आली , असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ.अशोक घोलकर यांनी त्यांच्या सेवेच्या काळातील कामाचे भरभरून कौतुक केले व त्यांच्या भावी यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तुळशीराम उकिरडे तर आभार प्रा.जयंत कांचनबटवे यांनी मानले.या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते