आमदार विनायकराव मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी येथे विविध कार्यक्रम
उस्मानाबाद :- तालुक्यातील रामवाडी येथे शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष , आमदार विनायकराव मेटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनाकारण खर्च टाळात सामाजिक बांधिलकी जपत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शेती उपयोगी साहित्य व विधवा महिलांना व साड्या व कुटुंबातील मुलींना ड्रेस वाटप रामवाडी सरपंच सौ.रेखाताई कोळी यांच्या हस्ते करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
यावेळी शिवसंग्राम उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष श्रीकांत भुतेकर , किसान आघाडी जिल्हाध्यक्ष रमाकांत हाजगुडे , तालुकाध्यक्ष रामराजे पवार , युवक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.रघु गोरे , माजी सरपंच विकास वाकुरे , कुंडलिक इंगळे , बाळु कोळी , सुखदेव साबळे , सतिष चौरे , काकासाहेब देवळकर व ग्रामस्थांची उपस्थितीत कोविड-१९ च्या प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
आमदार विनायकराव मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी येथे विविध कार्यक्रम
जुलै ०७, २०२१
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा