उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी मारहाण : चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी मारहाण : चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल


मारहाण.

 

पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण : दिनांक 04.07.2021 रोजी दुपारी आणणासाहेब पंढरी जाधव, रा.कौडगाव  हे त्यांचे पत्नीसह शेतात काम करता असतांना  त्यांचे भाउ नामदेव पंढरी जाधव रा.कौडगाव यांनी त्यांचे पत्नीस  तुम्ही लोक नांदवु देत नाही या कारणावरुन  दोघांनाही शिवीगाळ करुन कु-हाडीचे दांडयाने मारहाण केल्याने आण्णासाहेब  यांचा डावा हात फॅक्चर करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आण्णासाहेब यांनी  दिनांक 06 जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं  325,323, 504,506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे मुरुम: दिनांक  06.07.2021  रोजी 14.45 वा मलंग खाजासाब उस्तुरीवाले,रा. उडचणे प्लॉट, मुरुम हे काशीनाथ गायकवाड यांचे घराचे बांधकाम करत असतांना नामदेव पंडढरी जाधव,रा.कौडगाव यांनी दारु पिण्यास पैसे का देत नाहीस या कारणा वरुन मलंग यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देवुन लाकुड,लोखंडी सळई डोकीत, मानेवर मारुन जखमी केले. मलंग यांनी दिनांक 06  जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं  324,323, 504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे परंडा: प्रशांत शिवाजी घवले, रा. सिरसाव ता.परंडा हे दिनांक  22.06.2021 रोजी 17.30 वा त्यांचे शेतात होते. बिभीषण चौबे, रा.सिरसाव यांनी प्रशांतचा भाउ महेश घवले यास  मागील भांडणाचा राग मनात धरुन शिवीगाळ करु लागला. प्रशांत भांडण सोडवण्यास गेले असता बिभीषण चौबे यांनी त्यांचे हातातील विळयाने नाकार मारुन जखमी केले.अशा मजकुराच्या  जयकुमार प्रशांत घवले यांनी  दिनांक 06 जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं   324, 323, 504,506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे मुरुम : दिनांक 03.07.2021 रोजी 14.45 वा सु तुगांव तांडा येथे मुक्ताबाई गहिनीनाथ इगवे या त्यांचे किराणा दुकानात असतांना अविनाश, रवि व भास्कर राठोड, प्रविण राठोड  व इतर तिघे अनोळखी व्यक्ती सर्व रा.तुगांव यांनी आम्हांला किराणा माल उधार का दिला नाही. असे म्हणुन  मुक्ताबाई यांचे गळयातील दिड तोळयाचे गंठण घेतले तसेच दुकानातील 9 ते 10 हजार रुपये घेतले, मुक्ताबाई यांचा मुलगा सोडवण्यास आला असता त्यास पण मारहाण केली. तसेच दुकानाचे शटर वरती कु-हाडीने मारुन दुकानाचे नुकसान केले. मुक्ताबाई  इगवे यांनी  दिनांक 06 जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं   327, 452, 143, 147, 149,  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.



            “ चोरी.”

पोलीस ठाणे आनंदनगर: दिनांक 02.07.2021 रोजी 03.07.2021 रोजीचे रात्रीचे वेळी सतीश अंबादास आगलावे ,रा.रामनगर यांचे राहते घरासमोर लावलेली हिरोहोंडा पॅशनप्रो मोटार सायकल क्रमांक आर जे 13 एसए 6607 ही कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेली आहे. तर दिनांक  03.07.2021 ते 04.07.2021 चे रात्रीच्या वेळी शाहु नगर उस्मानाबाद येथुन कृष्णा भानुदास वायकर यांचे राहते घरासमोरुन एम एच 16 ए आर 860 ही बजाज कम्पनीची मोटार सायकल  कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेली आहे. सतीश आगलावे व कृष्णा  वायकर यांनी दिनांक 06 जुलै रोजी  दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हे नोंदवलेले आहेत.

पोलीस ठाणे तुळजापूर: लोकमत तालुका प्रतिनिधी गोविंद व्यकंटराव खुरद,रा.सारा गौरव तुळजापूर हे दिनांक 06.07.2021 रोजी 15.20 वा  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,तुळजापूर येथे खरेदी करता गेले होते. त्यांचे शर्टचे वरचे खिशातुन रेडमी नोट 9 कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे. गोविंद खुरद यांनी  दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे उमरगा: दिनांक 03.07.2021 रोजी 10.00 ते 15.00 वा सु शिवपुरी रोड उमरगा येथुन मनोज मललीनाथ घंटे यांची  होडां कंपनीची युनिकार्न  मोटार सायकल क्रमांक एम एच 13 बी ई 2777 ही कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेली आहे.  मनोज घंटे यांनी दिनाक 06 जुलै रोजी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे नळदुर्ग: दिनांक 06.07.2021 चे दुपारी हनमुंत नारायण राउत,रा.सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग यांचे राहते घराचे दरवाजाची कडी-कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील 18,000 रु रककम 4 कि.ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसुत्र असे कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेले आहे.  हनुमंत राउत  यांनी दिनाक 06 जुलै रोजी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top