मा. शरदचंद्रजी पवार साहेब फाउंडेशन कडून कोरोणा रुग्णांच्या सोयीसाठी व्हिलचेअर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द.

0


उस्मानाबाद :-  सामाजिक बांधिलकीतुन शरदचंद्रजी पवार साहेब फाउंडेशन उस्मानाबाद मार्फत कोरोणा रुग्णांच्या सोयीसाठी व्हिलचेअरच्या माध्यमातून छोटीशी मदत जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे सुपुर्द  करण्यात आले .

आराम प्रत्येकाला हवा असतो ,
आराम देणाऱ्या आरामाला जर आराम नाही मिळाला तर आरामातला 'राम' निघून जातो आणि उरते ती फक्त्त वेदना.
वेदना मग ती श्वास घेताना लागणारा दम असो वा
चालताना बसणारी धाप असो.
एक एक श्वास घेण्याकरिता जीवाची किती घालमेल होते किती दम बसतो हे कोविडग्रस्त रुग्णांच्या श्वास घेण्याच्या संघर्षाच्या क्षणीच लक्षात येते.

वयोवृद्ध रुग्णांना दोन पावलं सुद्धा चालणं खूप जड जात होते.
ही बाब लक्षात घेऊन मा. शरदचंद्रजी पवार फौंडेशनचे अध्यक्ष शेखर घोडके, उपाध्यक्ष रणवीर इंगळे फौंडेशनचे सचिव सूरज भैय्या मोठे व सर्व सदस्यांनी आपली सामाजिक बांधिलकी संवेदनशिलतेने लक्षात
घेऊन दि 30 जुन रोजी ज़िल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्याकडे चार व्हीलचेअर सुपुर्द केले.

यावेळी निवासी ज़िल्हाधिकारी शिवकुमार स्वामी ,  कळंब चे तहसीलदार रोहन शिंदे , व शरद चंद्रजी पवार साहेब फाउंडेशन चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

तहसीलदार रोहन शिंदे व जिल्हाधिकारी , निवासी जिल्हाधिकारी यांनी यांनी फौंडेशन चे सदस्य व इतिहासकार केतन पुरी यांनी ऐतिहासिक छायाचित्रांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमहत्वावर व त्यांच्या कार्यावर आपल्या संशोधनातून जो प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्याबद्धल केतन पुरी यांचे विशेष कौतुक केले हा प्रसंग आमच्याकरिता एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा देणारा ठरला आहे असे मत केतन पुरी यांनी यावेळी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top