तुळजापूर,दि.१, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी प्रभारी प्राचार्य मेजर प्रोफेसर डॉ वाय.ए.डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले.आपल्या भाषणात पुढे बोलताना ते म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्या एकुण जीवनावर महात्मा गांधी तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.वसंतराव नाईक यांनी आपल्या कारकीर्दीत शेतकऱ्यांच्या बाबत सकारात्मक निर्णय घेतले.तसेच पुरोगामी महाराष्ट्रात आज त्यांची ओळख ही वंचितांचे उध्दारकर्ते अशी आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे,आज तरुणांनी त्यांच्याप्रमाणेच आपल्या जीवनात विचार परंपरेची जोपासणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी प्रा.धनंजय लोंढे,प्रा.डॉ.एस.एम.देशमुख, कार्यालयातील सुमेर कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आशपाक आतार यांनी केले.यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेऊन सदर कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे , तुळजापूर