तुळजापूर :- श्री आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह आपल्या देशातुन लाखो भक्त पुजादर्शन साठी येतात मंदीर परीसर हा स्वच्छ आणि सुंदर दिसला पाहीजे परंतु नगरपालीका प्रशासन मंदिरासमोरील भागात स्वच्छालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे असे ऐकण्यात आले हा निर्णय अत्यंत चुकीचा व निराशाजनक आहे कारण मंदिरासमोर स्वच्छालय बांधल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती नाकारता येत नाही व मंदिर परीसरातील उल्हासदायक वातावरण दुषीत होईल मंदिराच्या उजव्या बाजुस स्वच्छालय असताना दुसरे स्वच्छालय बांधने अत्यंत चुकीचे तसेच मंदिरामधील प्रत्येक दर्शन मंडपात स्वच्छालय आहे ज्या जागेवर स्वच्छालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो रद्द करुन त्या जागी राजे जुना प्रस्तावित राजे शहाजी महाराज यांच्या गळ्यात आई तुळजाभवानीची माळ व हातात परडी घेतल्याली पुतळा बसवण्यात यावा कारण मंदिरासमोरील दर्शनी भागात प्रसन्नता येईल आणि मंदिर परीसराच्या शोभेत भर पडेल तसेच भोसले घराण्याचे राजे शहाजी महाराज यांची कुलदैवत आई तुळजाभवानी आहे महाराष्ट्र राज्यातील व देशातील भक्तांसाठी भक्तीमय आकर्षण दिसेल व भक्तांमध्ये उल्हासदायक व भक्तीमय वातावरण निर्माण होईल त्या जागी स्वच्छालय बांधल्याने पावसाळ्यामध्ये मंदिर परीसर अस्वच्छ होईल रोगराई वाढेल नैराश्याचे वातावरण निर्माण होईल याचा विचार करून नगरपालीका प्रशासनाने पुजारी वर्गाच्या व भक्तांच्या भावनांचा आदर व विचार करुन तात्काळ निर्णय बदलावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे , तुळजापूर