तामलवाडी येथील श्री शिवाजी सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड.
तुळजापूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर तालुका विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष श्री गोकुळ तात्या शिंदे यांच्या आदेशानुसार श्री शिवाजी सावंत गाव तामलवाडी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व आदरणीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे धोरण लक्षात घेऊन जनमानसातील आत्मविश्वास वाढावा संकल्प सिद्धी साठी निर्धारपूर्वक प्रयत्न करण्याची जनमानसातील शक्ती वाढावी आणि आत्मसन्मानाने जगण्याची संधी सर्वांना उपलब्ध व्हावी, याकरिता पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून कार्यक्रम राबवण्याची व प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यावी, आपण आपल्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका गाव पातळीवर संघटनात्मक बांधणी करून व शाखा स्थापन करून आपले आदरणीय नेते प्रदेशाध्यक्ष ना, श्री जयंत पाटील साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, यांचे नेतृत्व अधिक बळकट करावे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे , तुळजापूर