उस्मानाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून वीर शिवा काशीद यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त उस्मानाबाद शहरातील वीर शिवा काशीद चौक येथे विवेकानंद युवा मंडळ व अखिल भारतीय जिवा सेना मार्फत त्यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, शुभम कदम, शुभम मगर, विजय साळवी, ज्ञानेश्वर मोरे, अमोल जगदाळे, दत्ता पवार, अजित लाडुळखर यांच्या सह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.