विधवा , वयोवृद्ध , दिव्यांग , शालेय विद्यार्थी यांची होत असलेली अर्धिक पिळवणूक तात्काळ थांबवणे याबाबत जनहित संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

0
  

 तुळजापूर :- शहरातील आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा केंद्र परवाना धारक व ग्रामीण भागातील परवाना धारक हे तुळजापूर शहरात ग्रामीण भागातील परवण्याचा वापर करून विधवा , वयोरुध , दिव्यांग , शालेय विद्यार्थी यांची प्रत्येक ऑनलाईन नोंदी साठी शासनाने ठरवून दिलेला दर रु.३३.६०..रु.५७.६०.ऐवजी मनमाणी पध्दतीने २००.३००.५००.असे दर आकारून नागरीकांच्या मजबुरीचा फायदा घेऊन आर्थिक पिळवणूक करीत आहेत,तरी मे.साहेबाना विनंती की सदरील परवाना धारकांना शासनाच्या नियमनुसार दर पत्रक लाऊन दर पत्रकांनुसारच फी आकारण्याच्या सुचणा द्याव्यात अन्यथा अश्या गोरगरिबांची लूट करणाऱ्या आपले सेवा सरकार केंद्र व महा ई सेवा केंद्र परवाना धारक यांच्या दुकानाला टाळे ठोको आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी. या निवेदनावर अजय (भैय्या) साळुंके, प्रशांत कदम सोंजी, संतोष (अण्णा) भोरे, नितीन कांबळे, विशाल साळुंखे, बजरंग शिरसागर, आदी पदाधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी संकलन रूपेश डोलारे , तुळजापूर .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top