कोवीडची लस सुरक्षित आहे लसीकरण नागरिकानी करून घ्यावे - नगरसेवक अभिजित कदम

0

कोवीडची लस सुरक्षित आहे लसीकरण नागरिकानी करून घ्यावे - नगरसेवक अभिजित कदम

मी लस घेतली तुम्ही घ्या ..


तुळजापूर :- कोविड १९ साठी देण्यात येणारी लस ही सुरक्षित असून तालुक्यासह शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता किंवा मनात कोणतीही भीती न बाळगता मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घ्यावे
असे आव्हान नगरसेवक अभिजित कदम यांनी केले आहे.

कोरोणाचा प्रादुर्भाव वाढुनये व कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी सरकारणे संपूर्ण देशात लसीकरण सूरू केले आहे.ही लस आतिशय सुरक्षित आहे.ही लस घेतल्यानंतर नागरिकांना कोणताही त्रास होत नाही त्यामुळे नागरिकांनी स्वतःसह कुटूंबाच्या सुरक्षेसाठी ही लस घेऊन हे लसीकरण यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे
तुळजापूर येथील उपरुग्णालय येथे लसीकरण सुरू आहे तसेच शहरात विविध ठिकाणी तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांत लसीकरण सरू आहे तरी ज्या ज्या नागरिकांना जे प्राथमिक केंद्र किंव्हा उपजिल्हा रुग्णालय जवळ आहे त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घ्यावे.तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. चंचला बोकडे, डाॅ. श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लससीकरण देण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील ६० वर्षावरील जेष्ठ  नागरीक शुगर , बी पी यासारखे आजार असणार्‍याणी तसेच ४५ वर्षापुढील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर जाऊन लसीकरण करून घ्यावे व सरकारला सहकार्य करावे असे आव्हान नगरसेवक अभिजित कदम यांच्या कडून करण्यात आले आहे.

बातमी संकन :-  रुपेश डोलारे तुळजापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top