कोंड येथील एकास चोरीच्या स्मार्टफोनसह ताब्यात

0



कोंड येथील एकास चोरीच्या स्मार्टफोनसह ताब्यात 

स्थानिक गुन्हे शाखा : चोरीस गेलेल्या भ्रमणध्वनिंचा ऑनलाईन शोध घेण्याचे काम उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्यामार्फत केले जाते. अशाच एका प्रकरणात उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 91 / 2021 या गुन्ह्यानुसार चोरीस गेलेला स्मार्टफोन कोंड ग्रामस्थ- प्रशांत शिंदे हा वापरत असल्याचे सायबर पोलीसांना समजले. या माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या  सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोना- महेश घुगे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने काल दि. 03 सप्टेंबर रोजी प्रशांत यास चोरीच्या स्मार्टफोनसह ताब्यात घेउन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top