उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी मोहिमेदरम्यान २० छापे
उस्मानाबाद जिल्हा : जुगार विरोधात उस्मानाबाद पोलीस दलाने उघडलेल्या मोहिमेदरम्यान शुक्रवार दि. 03 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात 20 छापे टाकले. या छाप्यात आढळलेले जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकुण 1,07,615 ₹ चा माल जप्त करुन गुन्ह्यातील 28 आरोपींविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे 20 गुन्हे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवण्यात आले आहेत.
1) तुळजापूर पो.ठा. हद्दीत प्रताप केमकर हे तुळजापूर नगरीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 620 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
2) नळदुर्ग पो. ठा. च्या पथकास इटकळ येथील म्हाळप्पा क्षिरसागर हे गावातील एका हॉटेजवळ तर नळदुर्ग येथील सतिश माने हे नळदुर्ग येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व एकुण 4,175 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
3) आनंदनगर पो.ठा. च्या पथकास सांजा येथील सुधीर चांदने हे त्यांच्या गावातील एका लाँड्रीसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 570 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
4) परंडा पो.ठा. च्या पथकास जवळा (नि.) येथील पाशा शिकलकर हे त्यांच्या गावात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 250 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
5) भुम पो.ठा. च्या पथकास भुम येथील पाशा शिकलकर हे भुम येथील गोलाई चौकाजवळ तर वालवड येथील गणेश मुसळे हे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व एकुण 960 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
6) आंबी पो.ठा. च्या पथकास खंडेश्वरवाडी येथील धर्मा सवासे, भारत कणसे, पंढरीनाथ जेकटे व उंडेगाव येथील मिलींद गंदे असे चौघे उंडेगाव शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,080 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
7) उमरगा पो.ठा. च्या पथकास उमरगा येथील समीर शेख हे शहरातील भाजी मंडईत तर नाईचाकुर येथील मिलींद कांबळे हे त्यांच्या गावातील समाज मंदीरासमोर मटका जुगार जालवण्याचे साहित्य व एकुण 1,490 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
8) उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास सांजा येथील हनुमंत जाधव हे छ. शिवाजी महाराज चौकातील एका शेडसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,170 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
9) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास सोरोळा येथे सतीश गायकवाड हे मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 490 रोख रक्कम बाळगलेले आढळले.
10) वाशी पो.ठा. च्या पथकास ईट येथे नारायण माळी हे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 200 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
11) ढोकी पो.ठा. च्या पथकास कोंड येथे करण शिंदे हे ऑनलाईन मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम असा एकुण 18,050 ₹ रकमेचा माल बाळगलेले आढळले.
12) लोहारा पो.ठा. च्या पथकास लोहारा येथे दयानंद नारायणकर हे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य, 770 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
13) मुरुम पो.ठा. च्या पथकास येणेगुर येथे अशोक माने हे मटका जुगार चालवण्याचे साहित्य, 430 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
14) तामलवाडी पो.ठा. च्या पथकास पिंपळा (बु.) येथे तानाजी जाधव हे त्यांच्या केशकर्तनालय दुकानासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य, 1,170 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
15) स्था.गु. शा. च्या पथकाने कळंब शहरात तीन ठिकाणी जुगार विरोधी छापे मारले. यात पहिल्या घटनेत वसीम मिर्झा, शमशेर पठाण हे दोघे कळंब बसस्थानकाजवळ एका शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,120 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले. दुसऱ्या घटनेत आफ्रीदी शेख, अमिर शेख हे दोघे कळंब बाजारा मैदानात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 910 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले. तर तीसऱ्या घटनेत स्वामी विरभद्रया, निलेश गवळी, सचिन सुरवसे, समाधान गायकवाड, हे चौघे बाजार मैदानाजवळील एका दुकानात व्हिडीओ गेमवर जुगार खेळतांना जुगार साहित्यासह रोख रक्कम असे एकुण 74,160 ₹ च्या मालासह आढळले.