वीज चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल.
उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : विद्युत मीटरच्या पाठीमागून तारा जोडून विजयकुमार रावसाहेब साळुंके, रा. करजखेडा, ता. उस्मानाबाद यांनी त्यांच्या राहत्या घरासह लगतच्या दुकानासाठी जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत वीज चोरी केले असल्याचे महावितरण कार्यालय, उस्मानाबाद येथील भरारी पथकास आढळले. यावरुन सहायक अभियंता- प्रदिप मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वीज अधिनियम कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.