उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी , विनयभंग , अपघात , मारहाण संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
चोरी.”
कळंब पोलीस ठाणे : दत्तनगर, कळंब येथील बिजेकराम दगडु वरपे हे दि. 02 सप्टेंबर रोजी 11.30 ते 20.30 वा. दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञाताने तोडून घरातील 40 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, चांदीचे पैंजण एक जोड, तीजोरीच्या चाव्या व 27,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : शिवनेरी नगर, उस्मानाबाद येथील बाहुबली देविदास पंडीत हे दि. 02- 03 सप्टेंबर रोजीच्या रात्री आपल्या घरात झोपलेले होते. दरम्यान त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञाताने तोडून घरातील 50 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 1,500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे : बाबासाहेब हरीबा कुटे, रा. सोनगिरी, ता. भुम हे दि. 02 सप्टेंबर रोजी 12.15 वा. सु. भुम बसस्थानकात वाशी- पुणे बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन बाबासाहेब कुटे यांच्या विजारीच्या पाठीमागील खिशातील 18,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“विनयभंग.”
शिराढोन पोलीस ठाणे : एक 17 वर्षीय तरुणी (नाव- गाव गोपनीय) दि. 03 सप्टेंबर रोजी 10.00 वा. शैक्षणीक कामानिमीत्त पायी जात असतांना तीच्या गावातीलच तीन तरुण दोन मोटारसायकलवर तेथे आले. त्यातील एकट्या तरुणाने तीचा हात पकडून तीला आपल्या मोटारसायकलवर बसण्यास सांगीतले. तर दुसऱ्या मो.सा. वरील दोघांनीही तीला त्या तरुणाच्या मो.सा. वर बसण्यास भाग पाडले. यानंतर त्यांनी त्या तरुणीस दुसऱ्या गावाच्या रस्त्यावर नेउन सोडून देउन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 363, 506, 34 सह पोक्सो कायदा कलम- 8 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अपघात.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : चालक- किरण कुमार कोराळी, वय 24 वर्षे, रा. कडगंची, ता. आळंद, राज्य- कर्नाटक हे दि. 30.08.2021 रोजी 21.30 वा. सु. नळदुर्ग- तुळजापूर रस्त्याने ट्रक क्र. के.ए. 25 डी 4161 ही चालवत जात होते. दरम्यान तांबोळी ढाब्याजवळील रस्त्यावर त्यांच्या समोरील अज्ञात चालकाने ट्रक. क्र. एम.एच. 25 यु. 1747 चा निष्काळजीपने अचानक ब्रेक दाबल्याने किरण कोराळी यांचा ट्रक त्या समोरील ट्रकवर जाउन धडकला व कोराळी यांच्या ट्रक मागे येत असलेला ट्रक क्र. एम.एच. 25 बी 9767 हा कोराळी यांच्या ट्रकला पाठीमागून धडकला. या अपघातात किरण कोराळी हे गंभीर जखमी होउन मयत झाले तर त्यांच्या ट्रकचे सहायक- सुधिर ढोनी जखमी झाले. अपघातानंतर ट्रक. क्र. एम.एच. 25 यु. 1747 चा अज्ञात चालक वाहन अपघातस्थळी सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या सुधिर ढोनी यांनी दि. 03 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : नागझरी तांडा येथील श्रीराम धनसिंग पवार यांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 30.08.2021 रोजी 18.30 वा. सु. तांड्यावरील धनाजी ठाकुर पवार यांना गंधोरा शिवारातील तांबोळी ढाब्यासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या धनाजी पवार यांनी दि. 03 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : सिंदफळ येथील शिवाजी कापसे व सुनिल मिसाळ या दोन्ही कुटूंबात मोटारसायकल रस्त्यात लावण्यावरुन दि. 02 सप्टेंबर रोजी 21.30 वा. वाद झाला. यात दोन्ही कुटूंबीयांनी एकमेकांच्या कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शिवाजी कापसे व सुनिल मिसाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.