उस्मानाबाद शहरातील एकास बैकेची गोपनीय माहिती विचारून २ लाख ८९ हजार ३८९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक
आनंदनगर पोलीस ठाणे : तांबरी विभाग येथील गंगाराम लव्हे यांनी ‘5 पैसा’ या वेबसाईटचा संपर्क क्रमांक इंटरनेटवर शोधून त्या भ्रमणध्वनी क्रमांकाची सत्यता न तपासता दि. 10 ऑगस्ट रोजी 2021 रोजी त्या क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी समोरील अज्ञाताने गंगाराम यांच्या बँक खाते, डेबीट कार्ड, पासवर्ड, ओटीपी संदेश अशी गोपनीय माहिती विचारुन घेतली. गंगाराम यांनी सारासार विचार न करता ती गोपनीय माहिती त्या अज्ञातास सांगीतली. या माहितीच्या आधारे त्या अज्ञाताने गंगाराम यांच्या बँक खात्यातील 2,89,389 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत केली. यावरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.