उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी , एका ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल
आनंदनगर पोलीस ठाणे : लक्ष्मण त्रंबक नवले, रा. खानापुर, ता. उस्मानाबाद यांच्या बार्शी नाका, उस्मानाबाद येथील चहा टपरीचा कडी- कोयंडा दि. 05- 06 सप्टेंबर रोजीच्या रात्री अज्ञाताने तोडून आतील गॅस शेगडीसह टाकी, भांडी व 500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे : प्रभुलिंग बस्वलिंग भाळवणे, रा. वाशी यांच्या शिवकृता किराणा दुकानाचा पत्रा दि. 05- 06 सप्टेंबर रोजीच्या रात्री अज्ञाताने अचकटून दुकानातील खाद्यतेलाचे 5 डबे व 8 खोकी तसेच खोबरे तेलाच्या 30 बाटल्या असा माल चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : पुंडलिक घंटे, रा. एकुरगा, ता. उमरगा यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल ही दि. 31.08.2021 रोजी 19.00 ते 21.00 वा. सु. उमरगा चौरस्ता येथील सुदर्शन उडपी हॉटेल समोर लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : ईटकुर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या कार्यालयाचा कडी- कोयंडा अज्ञाताने दि. 05- 06 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून इंटेल कंपनीचे संगनकाचे 7 एलईडी संच, व्हिडीओकॉनचा 1 एलईडी टीव्ही असे 8 टीव्ही चोरुन नेले. यावरुन शाळा मुख्याध्यापक- श्रीमती शारदा मुंढे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
वाशी पोलीस ठाणे : आंद्रुड, ता. भुम येथील निवृत्ती तावरे, वय 25 वर्षे हे दि. 05 सप्टेंबर रोजी 17.00 वा. आपल्या घरात होते. यावेळी गावकरी सतिश लिमकर यांसह त्यांची दोन मुले रणजित व पवन यांसह गजेंद्र गिरी अशा चौघांनी आदल्या दिवशीच्या वादातून निवृत्ती यांच्या घरात घुसून निवृत्ती यांसह त्यांचे पिता- भरत यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, चाकू, लोखंडी गजाने मारहान करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या निवृत्ती तावरे यांनी दि. 06 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 452 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.