मंगरुळ ता.तुळजापुर येथील तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात ६५० रुग्णांची तपासणी व उपचार

0


मंगरुळ ता.तुळजापुर येथील तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात ६५० रुग्णांची तपासणी व उपचार

तुळजापूर :- डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र व तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिना निमीत्त आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन रविवार दि.५ सप्टेंबर २०२१ रोजी, मौजे मंगरुळ ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ५:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा मंगरुळ व परिसरातील सर्व वयोगटातील ६५० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.


या शिबीराचे उद्दघाटन माजी शिक्षक उपासेसर व प.स.सदस्य श्री चित्तरंजन अण्णा सरडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला माजी सरपंच प्रतापसिंह सरडे, प्रा.ए.झेड पटेल, सत्तार मुलानी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.पाटील मॅडम, सरडेवाडीचे सरपंच पिंटु क्षीरसागर, जेष्ठ नागरीक भारत दुलंगे, गोवींद डोंगरे, प्रशांत खोपडे, धनराज लबडे, गफुर शेख्‍, धर्मराज सरडे, कमलाकर उपासे, सयाजी शिंदे, अजिंक्य सरडे, दगडु डोंगरे, महादेव खोपडे, आबासाहेब सरडे, यशवंत डोंगरे, पांडुरंग हजारे, सुधीर कोरेकर, अमोर सरडे, महेश डोंगरे, संजय सरडे, विश्वनाथ माशाळकर, अतुल सारनी, वासुदेव सरडे, सोमनाथ चिवरकर, मदन डोंगरे, सचिन वाले, बाबासाहेब सरडे व ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अक्षय बहीर, डॉ.सौरभ विश्वकर्मा, डॉ.आनंद यादव, डॉ.सोहन रुपारेल, डॉ.परवीन सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. यावेळी तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओव्हाळ, रवि शिंदे, पवन वाघमारे, सचिन चव्हाण, बालाजी काकडे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशाताई, संगिता शिरगीरे, जयश्री लोहार, महादेवी गुरव यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top