वाहन परवान्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी डॉक्टरांना यूजर आयडी घेण्याचे आवाहन

0


वाहन परवान्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी डॉक्टरांना यूजर आयडी घेण्याचे आवाहन

     

  उस्मानाबाद,दि.04(जिमाका):-वाहनाच्या परवान्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना 1 (अ) देण्यासाठी पात्र डॉक्टराना युजर आयडी प्राप्त करुन घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

         राज्य शासनाने आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस  सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे.त्याप्रमाणे अर्जदारास घरबसल्या शिकाऊ परवानासाठी चाचणी देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या चाचणीत उत्तीर्ण होऊन संबंधितास घरबसल्या शिकाऊ परवान्याची र्प्रिट मिळते. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.त्यांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे.मोटार वाहन कायदा आणि अनुंषगीक नियमांप्रमाणे वाहन परवाण्यासाठी विषयक आवश्यक नमुना-1 (अ) हे वैद्यकीय प्रमाणपात्र हा डॉक्टरांमार्फत (नोंदणीकृत एमबीबीएस वैद्यकीय व्यवसायिक) ऑनलाइर्न पध्दतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित केली आहे.अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरांमार्फत करण्यात येऊन नमूना -1 (अ) अपलोड करण्यात येणार आहे.याकरिता जिल्हयातील पात्र डॉक्टरांनी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन User ID प्राप्त  करुन घ्यावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.

     संबंधित डॉक्टरांनी आवश्यक कागदपत्राच्या मूळप्रतीसह अनुज्ञप्ती विभाग,उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे संपर्क साधावा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top