google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 कोजागिरी पोर्णिमा: आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमेवर 21 ठिकाणी पोलीसांची नाकाबंदी.

कोजागिरी पोर्णिमा: आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमेवर 21 ठिकाणी पोलीसांची नाकाबंदी.

0


कोजागिरी पोर्णिमा: आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमेवर 21 ठिकाणी पोलीसांची नाकाबंदी.

उस्मानाबाद जिल्हा : जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने दि. 18- 20 ऑक्टोबर दरम्यान साजरी होणारी कोजागिरी पोर्णिमा रद्द करण्यात आली असून नमूद कालावधीत यात्रेकरुंना तुळजापूर गावात प्रवेशास बंदी आहे. त्या अनुषंगाने यात्रेकरुंना रोखन्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमेवर 

1)उमरगा पो.ठा.- तलमोड, कसगी 

2)मुरुम- केसरजवळगा, कोथळी, आलुर 

3)लोहारा- सास्तुर चौक 

4)नळदुर्ग- बोळेगाळ, गुळहळ्ळी, निलेगाव 

5)तामलवाडी- कठारे मिल सोलापूर हद्द 

6)तुळजापूर- ढेकरी हद्द 

7)बेंबळी- करजखेडा चौरस्ता 

8)उस्मानाबाद (ग्रा.)- चिलवडी, कौडगाव 9)येरमाळा- उक्कडगाव 

10)वाशी- पारगाव टोल नाका 

11)ढोकी- पळसप पाटी 

12)शिराढोण- ताडगाव 

13)कळंब- मांजरा नदी पुल 

14)अंबी- खर्डा हद्द 

15)परंडा पो.ठा.- लोहारा फाटा 

अशा 21 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. तसेच कानडी भाषीक यात्रेकरुंना संबंधीत आदेशाची माहिती व्हावी या उद्देशाने उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमा भागातील गावांत कानडी भाषेतील फलक पोलीस प्रशासनाने लावले आहेत.

            तरी जनतेने मनाई आदेशांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्रीमती- नीवा जैन यांनी केले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top