पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा आज दि २१ ऑक्टोबर रोजी उस्मानबाद जिल्हा दौरा

0


पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा आज दि २१ ऑक्टोबर रोजी उस्मानबाद जिल्हा दौरा

उस्मानाबाद:दि,२०(जिमाका) राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख उद्या दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी शासकीय मोटारीने सोनई तालुका नेवासा (जि. अहमदनगर) येथून पारगाव (ता.वाशी) कडे प्रयाण करतील.सकाळी १० वाजता पारगाव येथे आगमन आणि कोल्हापुरी बंधा-याची पाहणी करतील.यानंतर सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी वाशी तालुक्यातील पारा येथे कृषी विभागामार्फत आयोजित हरभरा प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमास उपस्थित राहतील.सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी कळंब तालुक्यातील  बहुला येथील कोल्हापुरी बंधा-याची पाहणी करतील. दुपारी १२ वाजता कळंब तालुक्यातील  खोंदला येथील कोल्हापुरी बंधा-याची पाहणी करतील.

दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव. दुपारी  २ वाजता शासकीय विश्रामगृह येथून स्त्री रुग्णालयातील मॉड्युलर ओ.टि चे लोकार्पण करतील.दुपारी २-वाजून ४० मिनिटंनी जिल्हा रुग्णालय येथे आगमन आणि लिक्विड मेडिकल ऑक्सीजन टॅंक प्रकल्पास भेट देऊन दुपारी ३ वाजता जिल्हा रुग्णालय येथून अणदूर (ता. तुळ्जापूर) कडे प्रयाण करतील. दुपारी  ४ वाजता अणदूर,( ता तुळजापूर) येथे आगमन आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सोईनुसार अहमदनगरकडे प्रयाण करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top