उस्मानाबाद शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते
संपन्न..
उस्मानाबाद :- शहरातील साईराम नगर येथील साई मंदिरा समोर सभा मंडप व समर्थ नगर काकडे मळा येथील देवी मंदिर समोर सभागृह उभारण्यासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून भूमिपूजन करण्यात आले . सभा मंडपाचे भूमिपूजन खासदार मा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ कैलास पाटील, नगराध्यक्ष श्री. मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उस्मानाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या मार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नसून अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमी प्रयत्नशील राहुत असा विश्वास आ कैलास पाटील यांनी दिला.
याप्रसंगी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शिवसेना शहरप्रमुख संजय मुंडे, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, नगरपालिका गटनेते सोमनाथ गुरव, उपशहरप्रमुख तुषार निंबाळकर, पंकज पाटील, नाना घाडगे, बंडु आदरकर,चेतन वाटवडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे, संजय भन्साळी, रमेश सारडा, अजय नाईकवाडी, सुमित बागल, तसेच परिसरातील नागरिक, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.