उस्मानाबाद,21(जिमाका) :-निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयास प्राप्त बक्षीस रक्कमेतून मंजूर आराखडयानुसार बीबीएफ ,स्पायरल ग्रॅव्हेटी सेप्रेटर आणि स्थानिक बियाणे या घटकांचा लाभ घेण्याकरीता यापूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु काही तालुक्यांमध्ये लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्याने अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या तालुक्यांमध्ये लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त आहेत. अशा तालुक्यामध्ये पुर्वीचे अर्ज निकाली काढण्यानंतर नवीन अर्जाचा विचार करण्यात येईल.पुढील घटकांचे दि. 28 जानेवारी-2022 रोजीपर्यंत मागविण्यात येत आहेत.
स्पायरल ग्रेव्हीटी सेप्रेटर-लाभार्थींचे विहित नमुन्यातील अर्ज अर्जामधील अटींची पुर्ततेसह तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावेत. स्पायरल ग्रेव्हीटी सेप्रेटर हे प्राधान्याने महिला बचत गट,शेतकरी गट यांना आणि वैयक्तिक शेतकरी यांना देण्यात येतील. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्की ड्रॉ पध्द्तीचा अवलंब केला जाईल. वैयक्तिक लाभार्थांमध्ये सिमांत शेतकरी ( 1 हेक्टर आतील ), लहान शेतकरी (1 ते 2 हेक्टर ) व इतर ( 2 हेक्टर पेक्षा जास्त ) शेतकरी यामध्येही अनुसुचित जाती,जमाती आणि महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल. या घटकाचा मालकी हक्क संबंधीत लाभार्थांकडे राहील. गटांच्या बाबतीत संबंधित गटाने स्पायरल ग्रेव्हीटी सेप्रेटर भाडेतत्वार दिल्यास त्यांची अभिलेखे ठेवणे आवश्यक आहे. हा घटक 90 टक्के अनुदानावर रक्कम दहा हजारच्या प्रती घटक मर्यादेत असेल. लाभार्थींना अनुदान डी.बी.टी पध्द्तीने त्यांच्या बँक खातेवर देण्यात येईल.
बी.बी.एफ -लाभार्थींचे विहित नमुन्यातील अर्ज अर्जामधील अटींची पुर्ततेसह तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावेत.बी.बी.एफ हे वैयक्तिक शेतकरी,शेतकरी गट आणि FPO (शेतकरी उत्पादक कंपनी) यांना देण्यात येतील. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास नोंदणीकृत FPO ,शेतकरी गट व वैयक्तीक शेतकरी असे प्राधान्य देण्यात येईल. वैयक्तीक लाभार्थांमध्ये सिमांत शेतकरी ( 1 हेक्टर आतील ), लहान शेतकरी (1 ते 2 हेक्टर ) आणि इतर ( 2 हेक्टर पेक्षा जास्त ) शेतकरी यामध्येही अनुसुचित जाती,जमाती व महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल.सदर घटक 60 टक्के अनुदानावर रक्कम रु.35000 च्या प्रती घटक मर्यादेत असेल.
लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्की ड्रॉ पध्द्तीचा अवलंब केला जाईल. लाभार्थींना अनुदान डी.बी.टी पध्द्तीने त्यांच्या बँक खातेवर देण्यात येईल.
स्थानिक भाजीपाला बियाणे किट -लाभार्थींचे विहित नमुन्यातील अर्ज अर्जामधील अटींची पुर्ततेसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. स्थानिक बियाणे किट हे मान्यता प्राप्त संस्था यांच्याकडून घेणे बंधनकारक आहे. किट मध्ये 30 ते 35 भाजीपाला बियाण्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.स्थानिक बियाणे हे महिला बचत गट आणि वैयक्तिक शेतकरी यांना यांना देण्यात येतील. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास महिला बचत गट आणि त्यानंतर वैयक्तिक शेतकरी असे प्राधान्य देण्यात येईल. वैयक्तिक लाभार्थांमध्ये सिमांत शेतकरी ( 1 हेक्टर आतील ), लहान शेतकरी (1 ते 2 हेक्टर ) आणि इतर ( 2 हेक्टर पेक्षा जास्त ) शेतकरी यामध्येही अनुसुचित जाती,जमाती आणि महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्की ड्रॉ पध्द्तीचा अवलंब केला जाईल. या घटक 100 टक्के अनुदानावर रक्कम रु.1000 च्या प्रती घटक मर्यादेत असेल. लाभार्थींना अनुदान डी.बी.टी पध्द्तीने त्यांच्या बँक खातेवर देण्यात येईल.
बियाणे नाव, वजन ग्रॅम असे आहेत-
पालक-10 ग्रॅम, धने 5, शेपू-10, माठ भाजी-5, मुळा-10, मेथी-10, वांगी-3, मिरची-3, गाजर-5, भेंडी-10, ढवळी चवळी-10, तांबडी चवली-10, गोडवाल-10 वालवड-10, हिरवा लांब घेवडा-10, बुटका घेवडा-10, शेवगा-10, भोपळा-10, श्रावण घेवडा-10, लाल शिराचा घेवडा-10,तांदुळका-5,चंदनबटवा-5,अंबाडी-10, डिंगरी-10,राजगिरा-5,कारले-10, डांगर-10,दोडका-10,घोसाळी-5, गवार-10, कडुवाल-10, फरसवाल-10,हिरवा घेवडा-10, काळा वाटणा-10,गबरा घेवडा-10,काकडी-2,लाल वालवड-10, ढवळा वाटणा-10 ग्रॅम असे आहेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद फोन - 02472-227118 सपर्क करावा.तसेच संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करावा