जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

0



उस्मानाबाद,दि.25(जिमाका):   राष्ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी कार्यालयात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी  सामुहीक शपथ घेण्यात आली. तसेच उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मतदार जागृती पंधरवाडया निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले. 


यावेळी उपजिल्हानिवडणूक अधिकारी योगेश खरमाटे यांनी प्रस्ताविक केली यावेळी नवी दिल्ली येथील भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचा शुभेच्छा संदेशाचे प्रेक्षेपण पाहण्यात आले. या कार्यक्रमात उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी यांना चार विधानसभा मतदार संघनिहाय चार बीएलओ अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी,चार पर्यवेक्षक,पाच निवडणूक ऑपरेटर आणि चार नायब तहसीलदार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


मतदार जागृती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.यात निबंध लेखन स्पर्धेत प्रथम पुरस्कार संजिवनी बाळकृष्ण पाटील,प्रथम पुरस्कार रांगोळी स्पर्धेत प्रथम पुरस्कार साक्षी शंकर हजगडे,  वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पुरस्कार संजिवनी बाळकृष्ण पाटील, प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम पुरस्कार वैभव बाबुराव रुपनर यांना प्राप्त झाला. या सर्व स्पर्धेकांना यावेळी बक्षीस वितरण अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी ,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश कोरडे,तहसीलदार (महसूल) प्रविण पांडे,नायब तहसीलदार (सा.प्र.)  पंकज मंदाडे, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.किरण थोरात,डॉ. राघवेद्र पाटील,बाल भारतीचे सदस्य तथा जि.प.चे शिक्षक समाधान शिकेतोड आदी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हानिवडणूक अधिकारी योगेश खरमाटे यांनी प्रस्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार चेतन पाटील यांनी केले.


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top